AmravatiLatest NewsSports

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती – (दि. 01/10/2025) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे 27 ते 31 ऑक्टोबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला असून, चमूंचा प्रशिक्षण वर्ग दि. 9 ते 18 ऑक्टोबर, 2025 दरम्यान डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे होणार आहे.
                  चमूंमध्ये शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाची कु.प्रिती सिरसाट, कु. आरती खिल्लारे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. संजिवनी दांडेकर, कु. गौरी ठाकरे, कु. पलक कुमारी, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारची कु. नैना वानखडे, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाडची कु. अनुप्रिया गावंडे, कु. भारती पवार, कु. प्रिया तायडे, शिवरामजी मोघे महाविद्यालय, केळापूरची कु. किरण चव्हाण, राजश्री शाहु विज्ञान महाविद्यालय,चांदुररेल्वेची कु. तनुश्री अवसरे, बाबाजी दाते महाविद्यालय, यवतमाळची कु. भाग्यश्री राठोड, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीची कु. फाल्गुनी कांबळे, जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापूरची कु. कल्याणी मेहर, नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतची कु. भक्ती कडू, बी.बी. आर्टस् एन.बी.कॉमर्स अॅन्ड बी.पी. सायन्स कॉलेज दिग्रसची कु. साक्षी ढेगडे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अकोलाची कु. श्रृती हिंगणकर हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button