Latest NewsMaharashtra

“भाजपमध्ये गेल्यावरच कर्जमाफी?” उद्धव ठाकरे सरकारला सवाल

शेतकऱ्यांच्या मदतीऐवजी जाहिरातबाजीचा सरकारला जास्त मोह, उद्धव ठाकरेंची महायुतीवर सडकून टीका

महाराष्ट्रात आलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. अशा परिस्थितीत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “भाजपमध्ये आल्यानंतरच कर्जमाफी मिळते का?”, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“राज्यात शेतकरी अडचणीत असताना सरकार जाहिरातीत व्यस्त आहे.”

“एक उपमुख्यमंत्री मदतीच्या किटवर फोटो छापण्यात, दुसरा कुठेच दिसत नाही.”

“साखर सम्राट भाजपात गेले की त्यांचे कर्ज सरकार हमीवर घेतंय, पण सामान्य शेतकरी मात्र गहाण पडतोय.”

“शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी आणि प्रति हेक्टर ₹५०,००० मदत मिळाली पाहिजे.”

मुख्य मुद्दे:

शेतकऱ्यांच्या अडचणींचं भांडवल करून सरकार फक्त जाहिरातबाजी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंचा.

ओला दुष्काळ म्हणून जरी संज्ञा नसेल, तरी हजारो हेक्टर शेतीचं नुकसान नाकारता येणार नाही.

ठाकरे यांनी आठवण करून दिलं की, फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

आता सरकार मात्र साखर कारखानदारांची कर्जे हमीवर घेते आणि शेतकऱ्यांवर भार टाकते.

उस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रती टन ₹१५ वसूल केला जात असल्याचीही टीका केली.

उद्धव ठाकरेंचा थेट सवाल:

“शेतकरी भाजपमध्ये गेला तरच कर्जमाफी होणार का? सरकारकडून मदतीऐवजी अन्यायच होत आहे.”

ठाकरे यांची सरकारला मागणी:

प्रति हेक्टर ₹५०,००० मदत द्यावी

शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं

ओला दुष्काळ मान्य करावा

जाहिरातबाजी थांबवून थेट मदतीच्या यंत्रणा राबवाव्यात

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button