Amaravti GraminEducation NewsLatest News

स्व. ॲड. शंकररावजी बोबडे उपाख्य भाऊसाहेब बोबडे 111 वी जयंती उत्सव निमित्य गो. से. कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न

खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव संचलित गो.से.महाविद्यालय, खामगाव येथे “स्व. ॲड. भाऊसाहेब बोबडे जयंती उत्सव – २०२५” निमित्ताने निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, पालक सभा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, एकल व समूहगीत गायन स्पर्धा व एकल व समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. भाऊसाहेब बोबडे जयंती उत्सव समिती समन्वयक डॉ डी एन व्यास सर,डॉ महेश गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख प्रा एस डी वाघ यांच्या हस्ते स्व. ॲड भाऊसाहेब बोबडे यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण व प्रतीमेचे पूजन  करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. चित्रकला व निबंध स्पर्धेत मोठ्यासंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी  सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा श्वेता कदम, प्रा पल्लवी खरात, प्रा अरविंद गोमेसे , प्रा धीरज मोहिते,प्रा गौरी पाटील,  प्रा मधुरा शिंगाडे यांनी परिश्रम घेतले . त्यानंतर ठीक 11 वा पालक सभेचे आयोजन करण्यात आले. पालक सभेस अध्यक्ष स्थान म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ पी व्ही उबाळे  व प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ सदस्य मा. श्री रविजी महर्षी व मा श्री शैलशजी मोहता,व  प्रमुख उपस्थिती म्हणून स्व. शंकररावजी बोबडे जयंती उत्सव समिती समन्वयक डॉ डी एन व्यास व  कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी प्रा एस डी वाघ, पालक प्रतिनिधी म्हणून श्री चंद्रकांत शेजव व श्री चावंडे सर व्यासपीठावर उपस्थित होते. पालक सभेस 110 पालकवर्गाची उपस्थिती होती. प्रास्ताविक मध्ये प्रा एस डी वाघ यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात असणारी कमतरता व पालक वर्गानी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे असे सांगितले,अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा पी व्ही उबाळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातील महाविद्यालयात होणाऱ्या योजना सांगितली. तसेच कार्यक्रमास क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभाग द्वारे तालुका, जिल्हा  व विभागीय स्तरीय विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला प्रथम घटक चाचणी परीक्षेत विज्ञान कला व वाणिज्य शाखेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला .सदर गुणगौरवाचे  वाचन प्रा डॉ अर्चना कुलकर्णी यांनी केले. पालक प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे संचलन प्रा योगेश टापरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा अशोक ढाले यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा पद्माकर कायपेल्लीवार , प्रा. डॉ. अर्चना कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .यानंतर दुपारी 1 वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत 32 विद्यार्थी सहभाग नोंदविला यामध्ये वर्ग अकरावी चे आठ गट व वर्ग बारावीचे आठ गट पाडण्यात आले होते. या 16 गटातून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा धर्मराज मोगल व प्रा सोनाली कोल्हे यांनी केले सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा अशोक ढोले यांनी केले. यानंतर 3 वाजता एकल / समूह गीत गायन स्पर्धा,  एकल / समूह नृत्य स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमास  डॉ. संगीता वायचाळ,डॉ अरविंद तायडे व  डॉ डी टी अढाव  परीक्षक म्हणून लाभले सदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा डॉ अर्चना कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा योगेश टापरे, प्रा आदर्श जगताप, प्रा सोनाली कोल्हे, प्रा गौरी पाटील, प्रा विनोद डाबरे, प्रा मधुरा शिंगाडे यांनी अथक परिश्रम घेतले. कनिष्ठ महाविद्यालय विभागात स्व.ॲड शंकररावजी बोबडे उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती उत्सव निमित्त निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,पालक सभा, प्रश्नमंजुषा स्पर्धा,एकल व समूह गीत गायन, एकल व  समूह नृत्यस्पर्धा चे आयोजन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा एस डी वाघ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा पी डी कायपेल्लीवार, प्रा डॉ अर्चना कुलकर्णी, प्रा अशोक ढाले, प्रा योगेश टापरे, प्रा धर्मराज मोगल प्रा पल्लवी खरात,प्रा श्वेता कदम, प्रा आदर्श जगताप, प्रा सोनाली कोल्हे, प्रा धीरज मोहिते ,प्रा अरविंद गोमासे, प्रा गौरी  पाटील, प्रा डॉ अनिता कामठेकर, प्रा विनोद डाबरे, प्रा मधुरा शिंगाडे व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री विठल चंदनकार, श्री सुखलाल कळसकार,अक्षय सो नो ने यश मोरे व NCC कडेट्स चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा डॉ सुभाषजी बोबडे, उपाध्यक्ष श्री प्रकाशजी तांबट, सचिव डॉ. प्रशांत बोबडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सर, उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल उबाळे सर, डॉ. देवेंद्र व्यास सर व प्रा एस डी वाघ सर यांच्या मार्गदर्शनामुळे सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडता आला.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button