Latest NewsMaharashtraUncategorized

नागपूरमध्ये सोनसाखळी चोरटे अटकेत, १.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर – नागपूर शहरात २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. भागवत पुंडलिक वघाळे हे व्दारका नगर परिसरातील आपल्या घरासमोर साफसफाई करत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील साडेएक तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून नेली. फिर्यादीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात ३०४, ३(५) भा. न्या. संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याच्या समांतर तपासासाठी सोनसाखळी विरोधी पथक सक्रिय झाले. सपोनि नितीन चुलपार यांच्या नेतृत्वाखालील टीमने तांत्रिक माहितीचा मागोवा घेत आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी कळमना परिसरातून टिपु सुलतान शेख याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत तब्बल १.३० लाखांची सोन्याची चैन आणि १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला. सखोल चौकशीत टिपु सुलतान याने कबुली दिली की त्याने आपल्या साथीदार स्वप्नील उर्फ काका मोटघरे याच्यासोबत मिळून २० सप्टेंबर रोजी सकाळी ही चोरी केली होती. याचबरोबर ९ सप्टेंबर रोजी बजाज नगर परिसरात आणि १८ ऑगस्ट रोजी जयप्रकाश नगरमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचीही कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून अॅक्टिव्हा गाडी, सोनसाखळी, मोबाईल असा एकूण १.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button