सावधान, तुमच्यासोबतही होऊ शकते हि घटना! अमरावतीत दुपारी धाडसी लुटीचा प्रयत्न

सावधान, तुमच्यासोबतही हि घटना होऊ शकते, अमरावती शहरातील वेलकम पॉइंट ते मोर्शी मार्गावर शुक्रवारी दुपारी धाडसी लुटीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २६ वर्षीय तेजस प्रवीण तायडे, राहणार प्रिया पार्क, हे आपल्या दुचाकीवरून जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. या आरोपींनी शस्त्राने वार करण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती युवकाने दिली. घटनेनंतर तेजस तायडे गाडगे नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल दोन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर फक्त एनसी दाखल करण्यात आली. शेवटी ३५१(२), ३५२ भा.न्या.संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने सांगितले की तीन अज्ञात आरोपींपैकी एक सरदारजी होता. पोलिस आता या आरोपींचा शोध घेणार का, असा प्रश्न फिर्यादीने उपस्थित केला आहे. घटनेनंतर फिर्यादी घाबरलेला असून त्यांनी आपली आपबिती सिटी न्यूजला सांगितली आहे….. …. … .. तर आपणही एकटे जातंय तर सावधान.. कदाचित हे तुमच्यासोबतही होऊ शकत, आणि अशा घटनांनंतर पोलिसांकडे जातानाही विचार करा, कारण पोलीस तक्रार तेव्हाच दाखल करतात जेव्हा तुम्हाला लुटलं जात….



