BhandaraLatest NewsMaharashtra

वीज कोसळली, गुराख्याचा मृत्यू; दुसऱ्या दुर्घटनेत घराच्या मोठ्या नुकसानाची नोंद

भंडारा – सावधान! जोरदार पावसामुळे वीज कोसळून मृत्यू आणि घरांचे नुकसान

राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा अजूनही सुरू आहे. सोलापूर आणि भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पाऊस पडल्याने अनेक भागात मोठे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये एका गुराख्याचा मृत्यू तर दुसऱ्या घटनेत घराचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

भंडारा आणि लाखनी तालुक्यातील घटना धक्कादायक आहेत. भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार शेतशिवारात पाळीव जनावर चराईसाठी गेलेल्या बबन भदाडे (वय ५२) यांच्यावर अचानक वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर झाडाखाली उभे असलेल्या बबन भदाडे यांच्यावर वीज कोसळल्याने जीव गेला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुसऱ्या घटनेत लाखनी तालुक्यातील बोरगावं राजेगाव येथील दुर्गाप्रसाद लांडेकर यांच्या घरावर वीज कोसळली. यामुळे घरातील वीज उपकरणे, साहित्य जळून खाक झाले, खिडक्यांचे काच फुटले आणि भिंतींना तडे गेले. मात्र, घरात कुणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली.

हवामान विभागाने राज्यातील नागरिकांना पुढील २४ तासांसाठी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील लोकांनी घराबाहेर जाण्यापासून टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button