Accident NewsMaharashtra
मुंबई: इमारतीला आग, दोघांनी खिडकीतून उडी मारली

मुंबई : गोरेगावमध्ये धक्कादायक घटना घडली. शालीमार मिरॅकल इमारतीला दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लागलेल्या आगीतून धुराचे लोट बाहेर पसरल्याने इमारतीत असलेल्या लोकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
जीव वाचवण्यासाठी दोन जणांनी घाबरून खिडकीतून उडी मारली. सुदैवाने ते चौथ्या मजल्यावरील गॅलरीवर पडले आणि कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दोघांना गंभीर दुखापत झाली नाही, परंतु हा प्रकार पाहून इमारतीतील इतर लोक घाबरले होते.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून फक्त तासाभरात आग आटोक्यात आणली. ही घटना इमारतीतील सुरक्षा आणि धावपळ याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित करते.



