Latest News

वाघ मोकाट, आणि वन कर्मचारीच पिंजऱ्यात; बोम्मलापुरा गावात नाट्यमय प्रकार..

कर्नाटक : ग्रामीण भागात मानवी वस्त्यांवर वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होण्याचं प्रमाण दिवसोंदिवस वाढत आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर देशातील इतर राज्यांमध्येही हे प्रकार दिसून येत आहेत. असं असतानाच ग्रामीण भागातील वस्तीवरील लोकांवर हल्ला करणाऱ्या अशाच एका वाघाला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच वाघाच्या पिंजऱ्यात डांबून ठेवण्यात आल्याचा विचित्र

कुठे घडला हा प्रकार?
हा प्रकार कर्नाटकमधील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये घडला आहे. येथील बफर झोनमध्ये भटकणाऱ्या वाघाला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा प्रयत्न करुनही अपयश मिळत असल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात 10 हून अधिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बंद केल्याचा प्रकार घडला.

अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याचं समजलं अन्…
तासाभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर स्थानिक सहाय्यक वनसंरक्षक सुरेश आणि नवीन कुमार घटनास्थळी पोहोचले, त्यांनी गावकऱ्यांची समजून घातली आणि कर्मचाऱ्यांना वाघाच्या पिंजऱ्यातून मुक्त केले.

गावात वाघाची दहशत
बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राला लागून असलेल्या गुंडलुपेटजवळ ही घटना घडली. बफर झोनमध्ये येणाऱ्या बोम्मलापुरा गावातील लोक गेल्या दोन महिन्यांपासून एका वाघामुळे त्रस्त असून भितीच्या सावटाखाली जगत आहेत. या वाघाने गावकऱ्यांच्या अनेक गुरांची शिकार केली आहे. अनेक तक्रारींनंतर, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी सापळा रचण्याचा निर्णय घेतला आणि पिंजरा लावला. पिंजरा लावल्यानंतर, अधिकारी आठवडाभर घटनास्थळी फिरकलेही नाहीत.

मंगळवारी नेमकं घडलं काय? वन कर्मचाऱ्यांना कोंडून घेण्याआधी काय झालं?
मंगळवारी सकाळी गंगप्पा नावाच्या व्यक्तीच्या शेतात वाघ दिसला. काही दिवसांपूर्वी वाघाने त्याच्या गुरांची शिकार केली होती. गावकऱ्यांनी शेतात वाघ दिसल्याचं वन अधिकाऱ्यांना फोन करुन कळवले. फोन केल्यानंतर एक तासाने वनअधिकारी घटनास्थली आले. अर्थात तोपर्यंत वाघ तिथून निघून गेला होता. वन अधिकाऱ्यांच्या दिरंगाई आणि निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी आलेल्या 10 वन कर्मचाऱ्यांना त्यांनीच लावलेल्या लोखंडी पिंजऱ्यात कोंडून ठेवले.

घटनेची माहिती मिळताच, बांदीपूर आणि गुंडलुपेटचे एसीएफ घटनास्थळी पोहोचले, त्यांनी ग्रामस्थांना शांत केले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोडले. दोन्ही एसीएफनी वाघाला पकडल्याशिवाय मुख्यालयात परत न येण्याचे आदेशही दिल्याची माहिती मिळत आहे.

हा प्रकार कुठे आणि केव्हा घडला?
हा प्रकार 9 सप्टेंबर 2025 रोजी कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यातील बोम्मलापुरा गावात, बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये घडला.

गावकऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यात का कोंडले?
गावकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाघाला पकडण्यात सातत्याने अपयश आणि निष्क्रियता दाखवल्याचा आरोप करत पिंजऱ्यात कोंडले. गावात वाघाने अनेक गुरांची शिकार केली होती आणि गावकऱ्यांच्या वारंवार तक्रारींकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने ते संतप्त झाले होते.

गावकऱ्यांचे नेमके आरोप काय होते?
गावकऱ्यांनी वन विभागावर आरोप केला की, त्यांनी वाघाला पकडण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत आणि फक्त पिंजऱ्यावर अवलंबून राहिले. तसेच, वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आणि पिंजरा लावल्यानंतर अधिकारी आठवडाभर गावात फिरकले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button