Latest NewsNagpur

नागपूरमध्ये एलन ट्युशन क्लासेसमध्ये बाथरूममध्ये विद्यार्थ्यांची हाणामारी

आठ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास नागपूरमधील नामांकित एलन ट्युशन क्लासेसमध्ये ही घटना घडली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थी बाथरूममध्ये एकमेकांना चित्रपटातल्या प्रमाणे लाथा-घुसे मारताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या हाणामारीदरम्यान तेथे कोणीही मध्ये पडले नाही. लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पालक या नामांकित ट्युशनमध्ये ऍडमिशन घेतात, परंतु अशा प्रकारची घटना समोर आल्याने ट्युशन क्लासेसमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांनी संताप व्यक्त करत क्लासेस प्रशासनाने त्वरित सुरक्षा व देखरेख वाढवावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून नागरिकांनी एलन ट्युशन क्लासेसच्या व्यवस्थापनावर टीका सुरू केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button