Crime NewsLatest News
खोटे आधार कार्ड दाखवून लाखो रुपयांची लूट करणारा आरोपी अटकेत

अमरावती : ८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोटे आधार कार्ड दाखवून लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खोटे आधार कार्ड वापरून मौल्यवान वस्तू व मुद्देमाल घेऊन लंपास झाला होता. परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू करून अल्पावधीतच आरोपीला बेड्या ठोकल्या. या आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गणेश पेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हेगार कितीही चलाख असले तरी पोलिसांच्या दक्ष तपासापुढे ते जास्त काळ टिकू शकत नाहीत, याचे उत्तम उदाहरण या कारवाईतून दिसून आले आहे



