Latest News

नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन पेटले: पंतप्रधान निवासस्थानाबाहेर गोळीबार, मंत्र्यांची घरं जळाली; संसद भवनाला घेराव

काठमांडू : नेपाळमध्ये सरकारविरोधातील Gen-Z आंदोलनाने भीषण वळण घेतलं आहे. सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार आणि आर्थिक अराजकतेविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने आता हिंसक रूप धारण केलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार, गृहमंत्र्यांच्या घराची जाळपोळ, आणि संसद भवनाचा घेराव अशा अनेक घटना सलग दुसऱ्या दिवशीही घडल्या आहेत.

नेपाळ सरकारविरोधातील संतापाचा स्फोट

8 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचं नेतृत्व ‘Gen-Z’ — म्हणजेच तरुण आणि विद्यार्थी वर्ग करत आहे. ‘हामी नेपाळ’ या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या निदर्शनात हजारो तरुण-तरुणी सहभागी झाले आहेत.

त्यांनी “भ्रष्टाचार बंद करा, सोशल मीडिया उघडा”, “ओली सरकार हटवा” अशा घोषणा देत काठमांडूतील संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवासस्थान अशा संवेदनशील ठिकाणी मोर्चा नेला. काहींनी बॅरिकेड्स तोडून संसदेत प्रवेश केला आणि रुग्णवाहिका जाळली.

हिंसेचा कहर: मंत्र्यांच्या घरांची तोडफोड, जाळपोळ

गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घरात तोडफोड करून आग लावण्यात आली

नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांच्या निवासस्थानावर हल्ला व आगजनी

माजी उपपंतप्रधान रघुवीर महासेठ यांच्या घरावर दगडफेक

कीर्तिपूर नगरपालिकेची इमारत पेटवली

प्रचंड यांच्या ललितपूरमधील निवासस्थानी हल्ला

राजधानीत संचारबंदी शिथिल करण्यात आली असली तरी पंतप्रधान निवास, संसद भवन, आणि प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरांभोवती अजूनही कडेकोट बंदोबस्त आहे.

सोशल मीडियावरील बंदी उठवली, पण संताप कायम

नेपाळ सरकारने 4 सप्टेंबर 2025 रोजी फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती.

या बंदीचा कारण होता – या कंपन्यांनी सरकारकडे अधिकृत नोंदणी केली नव्हती.
यामुळे अनेक तरुण, विशेषतः सोशल मीडियावर आधारित फ्रीलान्सर, इन्फ्लुएन्सर आणि उद्योजक रोजगार आणि कमाईपासून वंचित राहिले.

IT मंत्रालयाने बंदी हटवण्याची घोषणा केली असली तरी, तरुणांचा संताप शमलेला नाही.

भ्रष्टाचार व आर्थिक अस्थिरतेचा विस्फोट

नेपाळमध्ये प्रति व्यक्ती उत्पन्न केवळ $1300 आहे.

त्याच वेळी राजकीय नेत्यांच्या मुलांचे आलिशान जीवन, परदेशातील दौरे आणि गुप्त संपत्तीमुळे तरुणांमध्ये संताप वाढला आहे.

2017 च्या Airbus करारात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे.

पंतप्रधान ओली दुबईला जाण्याच्या तयारीत

सर्वात धक्कादायक म्हणजे, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत.
सूत्रांच्या मते, त्यांनी वैद्यकीय उपचाराच्या कारणास्तव Himalaya Airlines ला स्टँडबायवर ठेवले आहे.

दरम्यान, गृहमंत्री, कृषी मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
पंतप्रधानांनीही त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेत कार्यवाहक जबाबदाऱ्या उपपंतप्रधानांकडे सोपविल्या आहेत.

आंदोलनाचा पसारा देशभर

काठमांडू: आंदोलनाची सुरुवात मैतीघर परिसरातून

पोखरा, बुटवल, भरतपूर, इटहरी, दमक: आंदोलनाचा फैलाव

शालेय आणि महाविद्यालयीन गणवेशातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

सार्वजनिक वाहतूक ठप्प, अनेक ठिकाणी मोबाईल इंटरनेट मंद

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button