Latest News

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये नवा टप्पा; जड गर्डर बसवला

देशातील पहिल्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला महाराष्ट्रात मोठा वेग लागला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ ४० मीटर लांबीचा आणि ९७० टन वजनाचा गर्डर बसवण्यात आला आहे. हा गर्डर भारतातील सर्वात जड काँक्रीट स्ट्रक्चर मानला जातो आणि फुल स्पॅन बॉक्स लॉन्चिंग गेनट्रीच्या सहाय्याने बसवण्यात आला.

महाराष्ट्रातील १०३ किलोमीटरच्या मार्गासाठी एकूण २५७५ गर्डर बसवले जाणार आहेत. गुजरातकडून येताना बोईसर हा महाराष्ट्रातील पहिला स्टेशन असेल. या प्रकल्पामुळे मुंबई–अहमदाबाद अंतर अवघ्या काही तासांत पार करता येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

मागील काही वर्षे हा प्रकल्प संथ गतीने पुढे जात होता, मात्र गेल्या दोन वर्षांत कामाला गती मिळाली आहे. आता सर्वात लांबीचा गर्डर बसवल्यामुळे प्रकल्पाची गती अधिक वाढणार आहे. पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी बुलेट ट्रेन हा पर्यायी आणि वेगवान पर्याय ठरणार आहे.

सध्या एक गर्डर बसवला गेला असला तरी अजून जवळपास २५०० गर्डर बसवण्याचं काम प्रलंबित आहे. प्रकल्पाचे काम २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज बुलेट ट्रेन प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button