Latest News

गणेश मंडपात खेळता खेळता 10 वर्षीय मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण गावाला डोळ्यात पाणी आणणारी ठरली. फक्त दहा वर्षांचा श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, श्रावणने आपला अखेरचा श्वास आईच्या कुशीत घेतला.

अधिक माहितीनुसार, आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणारा श्रावण बुधवारी संध्याकाळी गणेश मंडळाच्या शेडमध्ये मित्रांसोबत खेळत होता. तो नेहमीप्रमाणेच हसत-खेळत होता. पण अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. खेळ सोडून तो घराकडे धावत गेला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून विसावला.

आई काही समजून घेते, तोवर श्रावणला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणातच त्याचे लहानसं आयुष्य संपलं. या घटनेने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

श्रावणच्या अकाली जाण्याने कोडोली गावात शोककळा पसरली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात अचानक आलेल्या या घटनेने वातावरण शोकमग्न झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button