Latest News

मुंबईला 26/11 पेक्षा मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस हायअलर्टवर

मुंबई : गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यातील अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पुन्हा एकदा मोठ्या दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर अज्ञात व्यक्तीकडून एक संदेश पाठवण्यात आला असून, त्यामध्ये 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

धमकीच्या या संदेशात म्हटले आहे की, या स्फोटांसाठी तब्बल 400 किलो RDX वापरण्यात येणार असून, त्यातून 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, विशेष पथकांकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जाहीर केला आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, हा मेसेज केवळ अफवा आहे की खरा धोका आहे, याबाबत तपास सुरू आहे. तरीसुद्धा कोणतीही जोखीम न पत्करता संपूर्ण मुंबईत सुरक्षेचे काटेकोर उपाय केले जात आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button