AmravatiLatest News

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेचा पारा चढला, 39डिग्री तापमान

अमरावती : जून महिन्याच्या प्रारंभीच विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. शुक्रवारी दुपारी तापमान तब्बल 38 अंश सेल्सिअसवर पोहोचले, ज्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

दुपारच्या सत्रात रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी तोंडाला आणि डोक्याला दुपट्टा बांधून उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसरात, आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधींनी याचे थेट दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

पावसाच्या विश्रांतीनंतर तापमानात उडी
गेल्या तीन आठवड्यांपासून मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे वातावरण थोडेसा गारवा निर्माण झाला होता. मात्र, शुक्रवारपासून हवामानात अचानक बदल झाला असून, आकाशातून जणू सूर्य आग ओकत असल्याचा भास होतोय.

नागरिकांनी घेतला स्वतःचा बचाव
दुपारच्या सत्रात दुचाकीवरून किंवा पायदळ प्रवास करणारे प्रत्येक नागरिक तोंडाला मास्क किंवा डोक्यावर स्कार्फ, दुपट्टा बांधून फिरताना दिसले. उन्हाच्या तीव्रतेमुळे रस्त्यावरची वर्दळ सुद्धा काही अंशी घटलेली दिसून आली.

हवामान विभागाकडून पुढील काही दिवस उन्हाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक नसल्यास बाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे आणि थंड हवामानात राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button