AmravatiLatest News

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत राज्यात अमरावतीचे विभागीय माहिती कार्यालय व्दितीय

अमरावती : 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्याच्या सर्व महसूली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. त्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या अमरावतीच्या विभागीय माहिती कार्यालयाने राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व महसूली विभागातील 40 विभागस्तरीय कार्यालये व सर्व जिल्ह्यातील 42 जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर या सर्वच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन करुन पुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या अतुलनीय कामगिरीबद्दल विभागीय माहिती कार्यालयांचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह व विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी देखील अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेत विभागीय स्तरावरील कार्यालयांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छत्रपती संभाजीनगर येथील संचालक (माहिती) यांच्या विभागीय माहिती कार्यालयास प्रथम क्रमांक, अमरावती येथील उपसंचालक (माहिती) यांच्या विभागीय माहिती कार्यालयास द्वितीय क्रमांक, नागपूर येथील संचालक (माहिती) यांच्या विभागीय माहिती कार्यालयास तृतीय क्रमांक मिळाला आहे.

या स्पर्धेतील यशस्वीतेसाठी अमरावती विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील विजय राऊत, विश्वनाथ धुमाळ, दिनेश धकाते, विजया लोळगे, वैशाली तराळे, सुनील काळे, मनोज थोरात, मनिष झिमटे, मो. हबीब शेख, कुमार हरदुले, जयप्रकाश बानाईत, राहुल साबळे, सुधीर पुनसे, अनिल वाडाने, कांचन अंधारे, दिपाली खडके, गजानन पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button