AmravatiCity CrimeLatest News

शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई! जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

अमरावती :- शहरातील वाढत्या गुन्ह्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं! मात्र, अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अवघ्या काही दिवसांतच जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींना गजाआड करून मोठी कारवाई केली आहे! पोलिसांनी अत्यंत शिताफीने गुप्त माहितीच्या आधारे दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यांची संपूर्ण माहिती आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल पाहूया फक्त CITY NEWS वर!

राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकविरा नगरात ३ जानेवारीला रात्री मोठी चोरी घडली! फिर्यादी भास्कर हागे यांच्या अंगणात ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवली, एवढंच नाही तर त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेली २० हजारांची रोकडही लंपास करण्यात आली!

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती! शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गुप्त माहितीचा आधार घेतला आणि शेवटी या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवलं! अमरावतीतील चवरे नगरमध्ये राहणारा २८ वर्षीय पंकज राजू गोंडाने आणि गांधी चौक येथील ३४ वर्षीय सागर जनार्धन गोगटे यांना १ मार्चला यवतमाळ येथून अटक करण्यात आली! त्यांच्या ताब्यातून तब्बल ५० हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली! फक्त एवढंच नाही! फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सराफ ले-आउट येथे एका घरात चोरट्यांनी लोखंडी ग्रील तोडून प्रवेश केला आणि घरात असलेल्या महिलेला आणि तिच्या आईला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने सोन्याचे दागिने ओरबाडून नेले! या धक्कादायक घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते! गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत २९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला! या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली! या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, पोलीस कर्मचारी सतीश देशमुख, फिरोज खान, सचिन बहाळे, अलीमुद्दीन खतीब आणि त्यांच्या टीमने मोठे योगदान दिले!

शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांवर पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे! अवघ्या काही दिवसांतच जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करण्यात आलं आहे. मात्र, शहरात अजूनही अनेक गुन्हेगार सक्रीय आहेत. तुम्ही सावध रहा, आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button