AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

नवनित राणा यांच्या चाहत्याची अनोखी पदयात्रा; आंध्रप्रदेशातून १२०० किलोमीटर चालत अमरावतीत आगमन

शेखर नायडू यांचा निजामाबाद ते अमरावती १५ दिवसांचा पायी प्रवास; आवडत्या नेत्या नवनित राणा यांची घेतली सदिच्छा भेट

अमरावती : भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनित राणा यांच्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी आंध्रप्रदेशातील एका चाहत्याने तब्बल १२०० किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली आहे. आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील राजम गावचे रहिवासी शेखर नायडू यांनी निजामाबाद ते अमरावती असा १५ दिवसांचा पायी प्रवास करून अमरावती गाठले. येथे आल्यानंतर त्यांनी नवनित राणा यांची सदिच्छा भेट घेतली.

शेखर नायडू हे नवनित राणा यांचे कट्टर चाहते असून, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा मनात बाळगून त्यांनी हा खडतर प्रवास केला. सलग १५ दिवस पायी चालत त्यांनी सुमारे १२०० किलोमीटरचे अंतर पार केले. अमरावतीत पोहोचल्यानंतर आपल्या आवडत्या नेत्या नवनित राणा यांची भेट घेण्याची संधी त्यांना मिळाली.

या भेटीदरम्यान शेखर नायडू यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आनंद गगनात मावेनासा झाल्याचे सांगितले. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नवनित राणा यांच्याविषयी असलेली आत्मीयता, प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी केलेली ही अनोखी पदयात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका चाहत्याने आपल्या आवडत्या नेत्याच्या भेटीसाठी घेतलेले कष्ट आणि पूर्ण केलेला प्रदीर्घ प्रवास यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button