Amravati GramincitynewsLatest NewsMaharashtra

कौंडण्यपूरमध्ये सातव्या वर्षी आंबा-रुक्मिणी महोत्सवाचा उत्साह; वर्धा नदी घाटावर भव्य महाआरती

२१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन; एक लाख दिव्यांचा दीपोत्सव, राज्यस्तरीय मॅरेथॉन आणि बैलगाडा स्पर्धांचे आकर्षण

कौंडण्यपूर : कौंडण्यपूर येथे सातव्या वर्षी आयोजित तीन दिवसीय आंबा-रुक्मिणी महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने एक लाख दिवे प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव, वर्धा नदीची महाआरती, राज्यस्तरीय मॅरेथॉन, बैलगाडा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी पुरा ते कौंडण्यपूर अशी १० किलोमीटरची राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

याच दिवशी वर्धा नदी घाटावर भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख आणि त्यांच्या पत्नी यांनी महाआरतीचा मान स्वीकारला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते.

महोत्सवात बैलगाडा स्पर्धेसह विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि क्रीडा उपक्रमांचा संगम असलेल्या या महोत्सवामुळे कौंडण्यपूर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button