Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

उमरीजवळ मध्यरात्री भीषण अपघात! रानडुक्कर आडवे आल्याने कार डिव्हायडरला धडकली

दोघे जखमी, एकाला किरकोळ दुखापत; हितेश बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना केली मदत

सावनेर | प्रतिनिधी

सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरी गावाजवळ मध्यरात्री भीषण अपघात घडला. अचानक रानडुक्कर रस्त्यावर आडवे आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन धडकली. शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोघे जण जखमी झाले असून, अन्य एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे.

रानडुक्कर अचानक रस्त्यावर आल्याने अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक MP 28 ZT 0963 ही सावनेरकडून पांढुर्णाच्या दिशेने जात होती. उमरी गावाजवळ अचानक रानडुक्कर कारसमोर आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. धडकेमुळे कारचे नुकसान झाले असून प्रवासी जखमी झाले.

सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांची तत्काळ मदत

अपघाताची माहिती सोहेल शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. माहिती मिळताच हितेश बनसोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर तसेच महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

हितेश बनसोड यांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

अपघातातील जखमींची नावे

  1. भूषण दिडमीसे (वय २०) – रा. येलकपार, जिल्हा पांढुर्णा.
  2. परसराम काकडे (वय ४०) – रा. सौसर.
  3. रामकृष्ण फिडकेकार (वय २६) – रा. येलकपार, किरकोळ जखमी.

वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

रात्रीच्या वेळी जंगल परिसरातून प्रवास करताना रानडुक्कर तसेच इतर वन्यप्राणी अचानक रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि विशेषतः जंगल परिसरातून प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगावी.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमच्या मदतीमुळे जखमींना वेळेत रुग्णालयात हलविण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button