अमरावती महापालिकेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी!

महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण; राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतली एकात्मतेची शपथ
अमरावती | प्रतिनिधी
भारताच्या माजी पंतप्रधान आणि भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून उपस्थित पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर श्रीचंद तेजवानी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते नाना आमले, डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमीद शेख वाहेद यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, उपसभापती आणि नगरसेवक उपस्थित होते.
यामध्ये झोन सभापती माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, इस्माईल कासम लालुवाले, किशोर जाधव, खॉ आसिया अंजुम वाहिद, विधी समिती सभापती स्नेहा आशिष लुल्ला, शहर सुधार समिती सभापती राधा राजू कुरील, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापती अॅड. प्रीती हर्षल रेवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता संदीप आवारे यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
तसेच नगरसेविका कल्याणी तायडे, मीनल सवाई, सुरेखा लुंगारे, अनिता काळे, लुबना तनवीर, फरहा नाज, कुबरा बानो, सुनीता लोणारे, राजश्री जटाळे, रेखा तायवाडे, पूजा अग्रवाल, सोनाली नाईक, मालता गवई, डॉ. अर्चना आत्राम, अर्चना पाटील, विद्या माटे, नूतन भुजाडे, स्मिता सूर्यवंशी, लविणा हर्षे यांच्यासह अनेक नगरसेविका उपस्थित होत्या.
नगरसेवक बबलू शेखावत, चंदू खेडकर, गुड्डू धर्माळे, विनोद तानवैस, प्रमोद महल्ले, प्रशांत महल्ले, ऋषिकेश देशमुख, अहमद शाह, धीरज हिवसे, संजय नरवणे, दीपक साहू सम्राट, मनीष बजाज, विक्की वानखडे, मंगेश मनोहरे, सचिन वैद्य, रतन डेंडुले, डॉ. संजय शिरभाते, योगेश विजयकर, प्रा. प्रशांत वानखडे, महेश मुलचंदानी, अॅड. प्रशांत देशपांडे, अनिल अग्रवाल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, भाग्यश्री बोरेकर, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी शिल्पा पवार, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भूषण खेडेकर, सतीश ताथोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारीही कार्यक्रमाला उपस्थित होते.



