citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

जरीपटका परिसरात स्टीलच्या दुकानात तोडफोड; दुकानदारासह कुटुंबीयांना मारहाण

वरच्या मजल्यावर राहणाऱ्या चार जणांचा राडा; बॅट आणि लाकडी चौरंगाने हल्ला, दुकानाचे एक लाखांचे नुकसान

नागपूर : शहरातील जरीपटका परिसरात स्टीलच्या दुकानात घुसून तोडफोड करत दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या चारच्या आसपास आरोपींनी दुकानात येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर बॅट आणि लाकडी चौरंगाचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, दुकानातील साहित्याचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जरीपटका पोलीस ठाण्याचे एपीआय पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजल्यापासून ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादींचे स्टीलचे दुकान असून, आरोपी याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास असल्याची माहिती आहे.

तक्रारीनुसार, ६ नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी वरच्या मजल्यावरून खाली आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद वाढत जाऊन आरोपींनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी बॅटने मारहाण करण्यात आली, तसेच लाकडी चौरंग फेकून मारल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादींना धमकावल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण प्रकारात दुकानातील साहित्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुकानात झालेली तोडफोड आणि कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अपराध क्रमांक ८२९/२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), २९६, ३५१(३), ३२४(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेत चारच्या आसपास आरोपी सहभागी असल्याची माहिती असून, आरोपींची भूमिका आणि वादामागील नेमके कारण याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

बाईट : एपीआय पांडुरंग जाधव, जरीपटका पोलीस ठाणे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button