citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; हुडकेश्वर पोलिसांच्या जाळ्यात तीन आरोपी!

दिघोरी चौकातील आयुषी अपार्टमेंटमध्ये छापा; १ किलो गांजा आणि १२.५८ ग्रॅम एमडी पावडरसह ९० हजारांचा मुद्देमाल जप्त, हैदराबाद कनेक्शन उघड

नागपूर : शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात हुडकेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. दिघोरी चौकातील सर्वश्री नगर परिसरातील आयुषी अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत १ किलो गांजा आणि १२.५८ ग्रॅम एमडी पावडर असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत डीसीपी झोन-४ रश्मिता राव यांनी माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथून कुरिअरच्या माध्यमातून नागपुरात अमली पदार्थांची खेप येणार असल्याची गोपनीय माहिती हुडकेश्वर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिघोरी चौकातील सर्वश्री नगर परिसरातील आयुषी अपार्टमेंट येथे लक्ष केंद्रित करून सापळा रचला. यावेळी संशयित हालचालींच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या झडतीदरम्यान आरोपींकडून १ किलो गांजा आणि १२.५८ ग्रॅम एमडी पावडर हस्तगत करण्यात आली. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल फोन आणि वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात हैदराबादहून कुरिअरद्वारे अमली पदार्थ नागपुरात कसे पोहोचवले जात होते, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि शहरात या पदार्थांची विक्री कोणामार्फत केली जात होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात हुडकेश्वर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. या तस्करीचे मूळ स्रोत आणि पुढील विक्री साखळी उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button