citynewsLatest NewsMaharashtraWardha

वर्धा जिल्ह्यात ४१ मतदान केंद्रांवर मतदान! २१ हजार ७४२ पदवीधर बजावणार हक्क

मतदानासाठी प्रशासन सज्ज; २५० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

वर्धा | सिटी न्यूज

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वर्धा जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रांवर मतदान होत असून, एकूण २१ हजार ७४२ पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २१ हजार ७४२ मतदारांची नोंद

वर्धा जिल्ह्यातील मतदार यादीत १३ हजार ९९ पुरुष मतदार आणि ८ हजार ६४३ महिला मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांसाठी जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

२५० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी आणि मायक्रो ऑब्झर्व्हर अशा २५० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय, मतदान केंद्रांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान शांततेत पार पडावे आणि निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे.

पदवीधर मतदारांच्या कौलाकडे लक्ष

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील पदवीधर मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. मतदानानंतर मतदारांचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने राहतो, याकडे राजकीय पक्षांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूज | वर्धा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button