citynewsLatest NewsMaharashtraNagpur

पार्वती नगर माजरीतील नागरिकांच्या समस्या ऐका त्यांच्याच तोंडून

रस्ते, स्ट्रीट लाईटसह प्राथमिक सुविधांचा अभाव; नागरिकांनी मांडल्या समस्या

माजरी : पार्वती नगर माजरी परिसरातील नागरिकांना विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, निवडणुका होऊन बराच कालावधी लोटला असतानाही परिसरातील प्राथमिक सुविधांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांची समस्या असून, स्ट्रीट लाईटची सुविधाही अपुरी असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी आज माध्यमांसमोर येत आपल्या परिसरातील समस्या मांडल्या. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी प्रशासन आणि संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

रस्ते, पथदिवे आणि इतर प्राथमिक सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पार्वती नगर माजरीतील नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत? ऐका, नागरिकांच्याच तोंडून…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button