citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

तिरंगा चौकात फलक झळकावत घोषणाबाजी; विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश


उपराजधानी नागपुरात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संताप पुन्हा एकदा रस्त्यावर पाहायला मिळाला आहे. तिरंगा चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या लावून धरल्या आहेत.


नागपूरच्या तिरंगा चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. परीक्षेतील कथित अनियमितता, पेपरफुटीचा वाद, परीक्षा प्रक्रिया आणि भरतीबाबतच्या विविध प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. यासोबतच परीक्षा प्रक्रिया पारदर्शक असावी, वेळापत्रकाबाबत स्पष्टता असावी आणि रखडलेल्या भरती प्रक्रियेला गती द्यावी, अशा मागण्याही विद्यार्थ्यांनी मांडल्या.

दरम्यान, राज्य सरकारने एमपीएससी परीक्षांबाबत काही निर्णय आणि आश्वासने दिली असली, तरी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम असल्याचे ताज्या अहवालांतून समोर आले आहे.


नागपूरनंतर राज्यातील इतर शहरांमध्येही एमपीएससीच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांचा आवाज अधिक तीव्र होताना दिसत आहे. आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासन आणि एमपीएससी प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button