City CrimecitynewsCrime NewsMaharashtraNagpur

कपिलनगर परिसरात होंडा गॅरेजला मध्यरात्री आग; कर्मचाऱ्यावर आग लावल्याचा आरोप

नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी परिसरात असलेल्या देवेश होंडा गॅरेजला मध्यरात्री आग लागल्याची घटना समोर आली आहे. हे गॅरेज सतीश यादव यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गॅरेजमध्ये काम करणारा राजू महेंद्रकर याने रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास गॅरेजला आग लावून घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. आगीमुळे गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाल्याची शक्यता असून, नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, कपिलनगर पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. गॅरेजला आग नेमकी कशामुळे लागली आणि या घटनेमागे संबंधित कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे घटनेचा अधिक तपास केला जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button