citynewsLatest NewsMaharashtraMumbai

IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरण | न्यायाच्या मागणीसाठी पालकांचे आझाद मैदानात उपोषण

साहिलला न्याय मिळावा, जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी; आई-वडिलांनी सुरू केले उपोषण

मुंबई : IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याला न्याय मिळावा आणि त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी साहिल वाकोडे यांचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणासाठी दाखल झाले आहेत.

साहिल वाकोडे यांच्या पालकांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

या उपोषणादरम्यान साहिल वाकोडे यांचे पालक तसेच त्यांचे वकील आझाद मैदानात उपस्थित आहेत. न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाकडे आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कोणत्या पद्धतीने पाहतात आणि पालकांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button