amravaticitynewsLatest NewsMaharashtra

साईनगरच्या साईबाबा गणेशोत्सव मंडळाचा डीजेमुक्त विसर्जन सोहळा

श्रुती मराठे आणि सोनाली कुलकर्णींची उपस्थिती ठरली आकर्षण; ढोल-ताशा, बँजो, डमरू आणि विविध देखाव्यांनी रंगला सोहळा

नागपूर : साईनगर येथील साईबाबा गणेशोत्सव मंडळाचा सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे यंदाचा विसर्जन सोहळा डीजेमुक्त ठेवत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

या विसर्जन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरल्या अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. त्यांच्या उपस्थितीमुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

विसर्जन मिरवणुकीत विविध पारंपरिक वाद्य पथकांनी सहभाग घेतला. साम्राज्य पथक, गोंडवाना ढोल-ताशा, जय अंबे बँजो, छत्तीसगड श्री महाकाल डमरू झांकी आणि उत्कर्ष ढोल-ताशा पथक यांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारून गेला.

यासोबतच वारकरी दिंडी, तसेच डोरेमॉन आणि भालू यांच्या आकर्षक देखाव्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून गणरायाला निरोप देण्याचा मंडळाचा निर्णय यावेळी विशेष ठरला. गणेशभक्तांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत शिस्त आणि उत्साहाचे दर्शन घडवले.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत शांततेत आणि सुव्यवस्थेत हा विसर्जन सोहळा पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यात आले.

भक्तिमय वातावरण, पारंपरिक वाद्यांचा निनाद, आकर्षक देखावे आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे साईबाबा गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा विसर्जन सोहळा भक्तांसाठी विशेष ठरला.

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button