BadneraNewscitynews

बडनेऱ्यात गणेश विसर्जनानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकाची स्वच्छता

नगरसेवक किशोर जाधव यांचा पुढाकार; आरोग्य विभागाच्या पथकाकडून परिसर स्वच्छ

अमरावती : गणेश विसर्जनाच्या उत्साहानंतर बडनेरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गुलालाने माखला होता. ही बाब लक्षात येताच नगरसेवक किशोर जाधव यांनी पुढाकार घेत आरोग्य विभागाच्या स्वच्छता पथकाला पाचारण केले. त्यानंतर चौकासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली होती. त्यामुळे बडनेरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुतळ्याच्या परिसरात गुलालाचा थर साचला होता. सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य आणि स्वच्छता कायम राखण्यासाठी नगरसेवक किशोर जाधव यांनी तातडीने स्वच्छतेची मोहीम राबवली.

आरोग्य विभागाच्या पथकाने पाण्याचा वापर करून चौक आणि पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमामुळे विसर्जनानंतर परिसराला पुन्हा स्वच्छ आणि नीटनेटके स्वरूप प्राप्त झाले.

गणेशोत्सवाचा उत्साह साजरा करताना सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रशासनासोबतच नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button