Accident NewscitynewsNagpur

नागपुरात अनियंत्रित ट्रकचा थरारक अपघात

वाहनांना जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

नागपुरात एका भीषण अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शालिनीताई मेघे रुग्णालयासमोर हा अपघात झाला. भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरील वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रक वेगाने येताना आणि अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील वाहनांना धडक देताना दिसत आहे. ट्रकच्या धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

दरम्यान, या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button