AchalpurAmravati GramincitynewsLatest NewsMaharashtra

जिवनपुरा अचलपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा!

रविभाऊ वानखडे मित्र परिवाराचा १५वा उपक्रम; बैल सजावट आणि वेशभूषा स्पर्धेत ४१५ चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अचलपूर | जिवनपुरा

जिवनपुरा अचलपूर येथील श्री संत श्रीराम बाबा संस्थान परिसरात तान्हा पोळ्यानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रविभाऊ वानखडे मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ सप्टेंबर २०२६ रोजी बैल सजावट स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे १५वे वर्ष असून, परिसरातील लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. काजल रविभाऊ वानखडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून युवा स्वाभिमान पार्टीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ वानखडे, दादाराव काळे, प्रकाश मेहरे, सुरेश पोहणकर, प्रकाश जयशिंगपुरे, ज्ञानेश्वर बोडखे, दिपाली पोहनकर, अंजली काळे आणि कोमल काळे यांची उपस्थिती होती.

तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित बैल सजावट आणि वेशभूषा स्पर्धेत तब्बल ४१५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. चिमुकल्यांनी आकर्षक पद्धतीने बैल सजवत तसेच विविध वेशभूषा साकारत आपले कलागुण दाखवले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना तीन प्रमुख बक्षिसे आणि तीन प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

बक्षीस वितरणाच्या वेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व चिमुकल्यांना शालेय साहित्य, फळे, सोनपापडी आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बक्षिसांसोबतच प्रत्येक सहभागी मुलाचा आनंद द्विगुणित झाला. कार्यक्रमस्थळी उपस्थित लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता.

तान्हा पोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना बैल, शेती आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. पारंपरिक सणाला स्पर्धा आणि मनोरंजनाची जोड देत मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम रविभाऊ वानखडे मित्र परिवाराकडून गेल्या १५ वर्षांपासून केले जात आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चक्रधर बोडखे, मंगेश व-हेकर, विनोद बोडखे, राज इरमल्ले, वैभव बोडखे, विशाल पांडे, अनिकेत रोही, आर्यन वाकपांजर, क्रांती वानखडे आणि आयुष वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले.

जिवनपुरा अचलपूर येथे सलग १५व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या तान्हा पोळ्याच्या उपक्रमाला चिमुकल्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ग्रामीण संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button