Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNanded

भरधाव मालवाहू वाहनाची स्कुटीला मागून धडक; २१ वर्षीय LLB विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

कॉलेजला जात असताना विष्णुनगरमध्ये भीषण अपघात; शिवाजीनगर पोलिसांकडून तपास सुरू

नांदेड : शहरातील विष्णुनगर परिसरात भरधाव मालवाहू वाहनाने स्कुटीला मागून जोरदार धडक दिल्याने २१ वर्षीय LLB विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कॉलेजला जात असताना हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला.

नांदेड शहरातील विष्णुनगर रोड क्रमांक २६ परिसरात हा अपघात झाला. नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये LLBचे शिक्षण घेणारी मानसी जाधव ही स्कुटीवरून कॉलेजला जात होती. त्यावेळी रेल्वे डिव्हिजनमधील एका मालवाहू वाहनाने तिच्या स्कुटीला मागून धडक दिली.

या धडकेत मानसी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

मानसी ही शिक्षणासोबत खासगी नोकरीही करत होती. अवघ्या २१व्या वर्षी झालेल्या तिच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी मालवाहू वाहन आणि अपघातग्रस्त स्कुटी ताब्यात घेतली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे विष्णुनगर परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button