citynewsJalgaonLatest NewsMaharashtra

बोरी नदीत पोहायला गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

शाळा सुटल्यानंतर नदीत पोहायला गेला; पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना, डॉक्टरांनी केले मृत घोषित

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कन्हेरे येथे बोरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दक्ष राजेंद्र नेरकर असे मृत बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर दक्ष हा बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

दक्ष पाण्यात बुडाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर दक्षला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.

यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दक्ष राजेंद्र नेरकर याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे कन्हेरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका १२ वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पावसाळ्यात नदी, नाले आणि जलाशयांमध्ये पाण्याची पातळी आणि खोली अचानक वाढत असल्याने नागरिकांनी तसेच पालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button