BreakingNewscitynewsNagpur

नागपुरात ब्लिंकिट डिलिव्हरी रायडर्सचा मोठा संप

पेआउट आणि इन्सेंटिव्हच्या मुद्द्यावर रायडर्स आक्रमक; स्टोअरबाहेर आंदोलन, आयडी बंद केल्याचा गंभीर आरोप

नागपुरात ब्लिंकिट डिलिव्हरी रायडर्सचा मोठा संप सुरू झाला आहे! पेआउट आणि इन्सेंटिव्हच्या मुद्द्यावर रायडर्स आक्रमक झाले असून स्टोअरबाहेर आंदोलन करण्यात आले. मेहनत करूनही योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप रायडर्सनी केला आहे. इतकंच नाही तर आपल्या समस्या आणि प्रश्न उपस्थित केल्यानंतर थेट आयडी बंद केली जाते, असाही गंभीर आरोप आंदोलक रायडर्सनी केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास संप सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाहूया आमच्या प्रतिनिधी रोहिणी सुखदेवे यांचा ग्राउंड रिपोर्ट.

नागपुरात ब्लिंकिटच्या डिलिव्हरी रायडर्सनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. पेआउट आणि इन्सेंटिव्हच्या मुद्द्यावरून रायडर्समध्ये नाराजी असल्याचे आंदोलनादरम्यान दिसून आले.

ग्राहकांना वेळेत डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी दिवसभर मेहनत करणाऱ्या रायडर्सना त्यांच्या कामाच्या तुलनेत योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

पेआउटच्या रचनेत बदल, इन्सेंटिव्हशी संबंधित अडचणी आणि कामाच्या मोबदल्याबाबत रायडर्सनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या मागण्यांकडे कंपनीने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

यासोबतच, आपल्या समस्या किंवा प्रश्न कंपनीसमोर मांडल्यानंतर थेट आयडी बंद केली जाते, असा गंभीर आरोपही काही रायडर्सनी केला आहे. त्यामुळे काम करण्याची संधीच हिरावून घेतली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या मागण्यांसाठी रायडर्सनी स्टोअरबाहेर एकत्र येत आंदोलन केले. जोपर्यंत आपल्या मागण्यांवर ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे डिलिव्हरी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून, कंपनीकडून या आरोपांवर आणि रायडर्सच्या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ग्राहकांपर्यंत काही मिनिटांत डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी धावणाऱ्या रायडर्सनाच आता आपल्या मेहनतीच्या मोबदल्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचा आरोप आहे! पेआउट, इन्सेंटिव्ह आणि आयडी बंद करण्याच्या आरोपांवर आता कंपनीकडून काय भूमिका घेतली जाते आणि रायडर्सचा संप कधी मिटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरातून सिटी न्यूजसाठी विशेष रिपोर्ट

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button