citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

ट्रिपल सीट दुचाकीवरून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांचा दणका!

कलमना पोलिसांची धडक कारवाई; वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांना भररस्त्यात मागावी लागली जाहीर माफी

नागपूर : दुचाकीवर ट्रिपल सीट बसून भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि सार्वजनिक रस्त्यावर हुल्लडबाजी करणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वतःसह इतर नागरिकांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांविरोधात कलमना पोलिसांनी धडक कारवाई केली. इतकेच नव्हे, तर पोलिसांनी या तरुणांना जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडत नियमभंग करणाऱ्यांना कडक इशारा दिला.

शहरातील रस्त्यांवर काही तरुणांकडून दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि विनाकारण हुल्लडबाजी करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका वाढण्यासोबतच इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.

या प्रकारांची दखल घेत कलमना पोलिसांनी संबंधित तरुणांविरोधात कारवाई केली. पोलिसांनी त्यांना समज देत सार्वजनिकरीत्या माफी मागायला लावली. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा मिळाला आहे.

पीएसआय सौरभ बूनगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईतून कलमना पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, रस्ते हे हुल्लडबाजीचे ठिकाण नसून प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमभंग करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button