Amravati GramincitynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

ग्राम गौरव पुरस्काराने प्रज्वल भुयार यांचा सन्मान

जळका पटाचे ग्रामपंचायतीचा उपक्रम; गावाच्या विकासातील उल्लेखनीय योगदानाची घेतली दखल

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी

जळका पटाचे येथे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह ग्राम गौरव पुरस्कार २०२६ सोहळ्यामुळे आणखी वाढला. गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय आणि प्रामाणिक योगदान देणाऱ्या व्यक्तीचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यंदाचा ग्राम गौरव पुरस्कार ग्रामसचिव प्रज्वल प्रवीणराव भुयार यांना प्रदान करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरस्कार सोहळा

जळका पटाचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राम गौरव पुरस्कार २०२६ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण आणि वृक्षारोपणानंतर जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी ग्रामसचिव प्रज्वल प्रवीणराव भुयार यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान

गावातील विविध विकासकामांना गती देणे, अतिक्रमणाची प्रकरणे आपसी सहमतीने मार्गी लावणे, गावाचे योग्य नियोजन करणे, कागदोपत्री कामकाज व्यवस्थित ठेवणे तसेच शासकीय जमिनींच्या योग्य नियोजनामध्ये प्रज्वल भुयार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामस्थांकडून अभिनंदन

सरपंच तथा प्रशासक पराग रमेशराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रामाणिक सेवा आणि गावाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत झालेल्या या सन्मानामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रज्वल भुयार यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button