citynewsDelhiLatest NewsMaharashtrapolitics

राहुल गांधी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार

पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनानंतर अटकेची कारवाई; तीन तासांनंतर सुटका

नवी दिल्ली | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर मंगळवारी काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे तीन तासांच्या कारवाईनंतर दोन्ही नेत्यांची सुटका करण्यात आली.

काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. या कारवाईवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, केंद्र सरकारवर लोकशाही दडपण्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, या घडामोडीनंतर आज सायंकाळी 4 वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते आंदोलन, पोलिसांची कारवाई तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी पत्रकार परिषदेत नेमके कोणते मुद्दे मांडणार, सरकारवर कोणते आरोप करणार आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button