AmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

भटक्या श्वानांच्या हल्ल्यातील जखमी चिमुरडीवर सुपर स्पेशालिटीत उपचार; आर्थिक मदतीचा हात

आमदार रवी राणा यांच्या आश्वासनानुसार उपचारासाठी सहाय्य; प्लास्टिक सर्जरीद्वारे पुढील उपचार होणार

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीतील रुक्मिणी नगर परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानवी कावरे हिच्यावर आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार रवी राणा यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उपचारासाठी आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भटक्या श्वानांच्या हल्ल्यानंतर सानवीवर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, पुढील विशेष उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन तिला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

युवा स्वाभिमान पार्टीतर्फे उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती तथा युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका ॲड. प्रीती हर्षल रेवणे यांनी रुग्णालयात भेट देत जखमी मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. तसेच उपचारासाठी आर्थिक मदत सुपूर्द करून कुटुंबाला धीर दिला.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी सानवीच्या चेहऱ्यावरील जखमांवर आवश्यक प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असून तिच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार केले जातील, अशी माहिती दिली. वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तिच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक ते सर्व उपचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेमुळे शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

जखमी चिमुरडीवर सर्वोत्तम उपचार करून ती लवकरात लवकर पूर्णपणे बरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी महानगरपालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button