citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

कपिलनगर पोलिसांची मोठी कारवाई; 121 ग्रॅम एमडी ड्रग्जसह तरुण अटकेत

साडेसहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कपिलनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून 121.63 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 6 लाख 77 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक नियमित पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, कबीर नगर चौक परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन फिरत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 121.63 ग्रॅम एमडी सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत 6 लाख 8 हजार 150 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तुळशीराम रामनाथ ठाकूर (वय 25 वर्षे, रा. समता नगर, नागपूर) असे आहे.

कारवाईदरम्यान आरोपीकडून एमडी पावडर, स्प्लेंडर मोटारसायकल, रेडमी नोट 13 फाईव्ह जी मोबाईल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा तसेच झिप लॉक पिशव्यांचे बंडल असा एकूण 6 लाख 77 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत आरोपीने हा अमली पदार्थ गौरव नंदागवळी याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र केला आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 450/2026 अन्वये अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस ॲक्ट) कलम 8(क), 22(क) आणि 29 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नागपूर शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. कपिलनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यातील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button