citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळमध्ये सिनेस्टाईल पोलिस कारवाई! देशी कट्ट्यासह संशयित आरोपी जेरबंद

यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पुसद ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. सांडवा परिसरात देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका संशयित आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून ताब्यात घेतले असून आरोपीकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुसद ग्रामीण पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. दरम्यान, ग्राम सांडवा ता. पुसद परिसरात एक इसम अवैधरित्या देशी बनावटी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच पुसद ग्रामीण पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयित आरोपी शेख अतीक शेख रशीद याला ताब्यात घेतले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटी गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 15 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 बाय 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पुसद ग्रामीण पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष चौधरी यांच्या पथकाने केली.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पुसद ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button