citynewsDharaShivLatest NewsMaharashtra

धाराशिवच्या उमरग्यात विजेचा शॉक लागून इंजिनीयर युवकाचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात विजेचा शॉक लागून एका इंजिनीयर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अजित नारायण शिंदे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पावसादरम्यान अजित शिंदे हे बाहेर असताना त्यांच्या हातातील छत्री विजेच्या तारेला लागली. यावेळी जोरदार शॉक बसल्याने ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे उमरगा शहरात हळहळ व्यक्त केली जात असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button