AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

ABP माझाच्या भव्य मंचावर अमरावतीची श्रुतिका गावंडे झळकली; ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’मध्ये विदर्भाचा दमदार आवाज

अमरावतीच्या मातीतून घडलेली एक तरुण डिजिटल क्रिएटर आज राज्याच्या मोठ्या मंचावर झळकली आहे. अमरावती जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि डिजिटल क्रिएटर श्रुतिका गावंडे हिने ABP माझा आयोजित ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रभावी उपस्थिती नोंदवत विदर्भाचं प्रतिनिधित्व केलं.

राज्याच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात श्रुतिका गावंडे हिने सोशल मीडियाची ताकद अधोरेखित करत ग्रामीण भागातील भाषा, संस्कृती आणि स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची भूमिका स्पष्ट केली.

आपल्या भाषणात श्रुतिकाने वर्‍हाडी भाषेची गोडी आणि तिचं वैशिष्ट्य अधोरेखित करत सांगितलं की, “वर्‍हाडी भाषा ही अत्यंत गोड, जिव्हाळ्याची आणि आपुलकीची आहे. आज सोशल मीडियामुळे गावाकडची बोली, संस्कृती आणि जीवनशैली थेट जगभर पोहोचत आहे.” तिच्या या वक्तव्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते. तसेच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांसारख्या कलाकारांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.

या प्रतिष्ठित व्यासपीठावरून श्रुतिका गावंडे हिने विदर्भाची ओळख, वर्‍हाडी भाषेची गोडी आणि ग्रामीण जीवनशैलीचं महत्त्व प्रभावीपणे मांडत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमरावतीसह संपूर्ण विदर्भासाठी ही अभिमानाची बाब मानली जात असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आवाज राज्यभर आणि देशभर पोहोचवणाऱ्या अशा तरुण क्रिएटर्समुळे विदर्भाची नवी ओळख घडत आहे. श्रुतिका गावंडे हिचं हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button