Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांवरून बजरंग दलाचं आंदोलन; राजकमल चौकात घोषणाबाजी

अमरावती शहरात कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांवरून वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. बजरंग दलाच्या वतीने आज राजकमल चौक येथे धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रपती आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या कथित घटनांचा उल्लेख करत महिलांवरील अत्याचार, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकारांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

बजरंग दलाच्या वतीने दिलेल्या निवेदनात अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक बंटी पारवावी आणि प्रदीप सोळंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महिलांची फसवणूक, दबाव, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजकमल चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.

या आंदोलनामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून, प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेणार आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button