AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत शिक्षक मेळावा आणि अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटप; मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी राहणार उपस्थित

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती विभागातील शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा विभागीय शिक्षक मेळावा, सत्कार समारंभ आणि अनाथ विद्यार्थ्यांना सायकल भेट कार्यक्रम रविवारी, १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षक महासंघ, अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत.

याशिवाय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आकाश फुंडकर, आमदार अशोक उईके आणि पंकज भोयर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक आणि नवोपक्रमात्मक उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

तसेच, या कार्यक्रमात अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकलचा मोठा आधार मिळणार असल्याने हा उपक्रम विशेष ठरणार आहे.

या कार्यक्रमामुळे शिक्षकांचा सन्मान होण्यासोबतच विद्यार्थ्यांनाही मदतीचा हात मिळणार असल्याने संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. आयोजकांनी शिक्षक, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button