Accident NewscitynewsIndia NewsLatest News

गुजरातमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले, ७ जणांचा मृत्यू

सुरेंद्रनगर (गुजरात) : राज्यात एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला असून, भरधाव ट्रकच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी उशिरा रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास लखतर–विरमगाम महामार्गावर हा अपघात घडला. राजकोटहून बहुचराजी मंदिरात दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांच्या गटाला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली.

लखतर तालुक्यातील भास्करपारा गावाजवळ हा अपघात झाला. या भीषण धडकेत ६ भाविक आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघातात काही जण जखमी झाले असून, त्यांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी अपघातामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button