citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार! ‘भावनिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद’ — हर्षवर्धन सपकाल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे माघार घेण्याची घोषणा केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना सपकाल म्हणाले की,
👉 “राजकीय संस्कृतीचा भाग म्हणून आणि भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही ही भूमिका घेतली आहे.”

याआधी काँग्रेसने बारामतीसह राहुरी मतदारसंघात भाजपविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
👉 “बारामतीतच नाही, तर राहुरीतही आम्ही भाजपविरोधात लढण्याचा निर्णय घेतला होता आणि घराघरात जाऊन प्रचारही सुरू केला होता,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत आणि काही भावनिक व राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पुढे विरोधकांची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📺 महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button