“अवकाळी पावसाचा कहर! नांदेडमध्ये शेतकऱ्यांचे उभे पीक जमिनदोस्त; अर्धापूर तालुका सर्वाधिक प्रभावित”

नांदेड
वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा कहर… नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अक्षरशः संकटाचे ठरले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अनेक भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर आलेल्या या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अर्धापूर तालुक्याला बसला आहे. येथील चेनापुर गावात नुकसानाचे भीषण चित्र समोर आले आहे.
चेनापुर येथील शेतकरी बालाजी राठोड यांनी अडीच एकरमध्ये उन्हाळी ज्वारीचे पीक घेतले होते. कापणीच्या उंबरठ्यावर असलेले हे पीक वादळी वाऱ्यामुळे आणि जोरदार पावसामुळे पूर्णपणे भुईसपाट झाले. शेतात उभं असलेलं ज्वारीचं पीक आडवं पडलेलं पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहत आहेत.
या नुकसानीमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. बालाजी राठोड यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
फक्त चेनापुरच नाही, तर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशाच प्रकारे पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
❗ मोठा प्रश्न:
👉 शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन किती लवकर मदतीचा हात देणार?
एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे आर्थिक संकट… अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. शासनाने जलद गतीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देणे अत्यंत आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या या वेदना समजून घेणं आणि त्यांना आधार देणं ही समाजाचीही जबाबदारी आहे.
अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी पाहत राहा – सिटी न्यूज



