citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraThane

मीरा रोडमध्ये धक्कादायक घटना; शरीरसुखाची मागणी नाकारल्याने महिलेची निर्घृण हत्या, अभिनेता अटकेत

ठाणे (प्रतिनिधी):
ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शरीरसुखाची मागणी नाकारल्याने एका ३७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील ‘चंद्रेश अकॉर्ड’ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. आरोपी आशिष मेश्राम याने स्वतःच्या घरी काम करणाऱ्या चार मुलांच्या आई असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. मात्र, महिलेने त्यास नकार दिल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात महिलेच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर वार करण्यात आले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून त्याला अटक केली. सध्या आरोपी ट्रान्झिट रिमांडवर असून, लवकरच त्याला मीरा रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button