citynewsIndia NewsLatest Newspolitics

पंतप्रधान मोदींकडून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन; ११,२०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू

नोएडा (प्रतिनिधी):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे विकसित करण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन केले. सुमारे ११,२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासह कार्गो हबचाही शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक तसेच केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राम मोहन नायडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिरोजाबादमध्ये तयार करण्यात आलेली काचेची गौतम बुद्धांची प्रतिमा पंतप्रधान मोदी यांना स्मृतिचिन्ह म्हणून भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत, “नव्या भारतातील नव्या उत्तर प्रदेशाच्या विकास यात्रेला आज एक नवे शिखर गाठण्याची संधी मिळत आहे,” असे म्हटले होते.

या विमानतळामुळे उत्तर प्रदेशातील औद्योगिक, व्यापार आणि वाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, देशातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक म्हणून त्याची ओळख निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button